आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य:उमरगा येथेही वक्तव्याचा निषेध ; उमरग्यात भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य केले असून याचा उमरग्यात भाजपच्या वतीने निषेध करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन इतिहास, साहित्यकार, बखरी आणि साहित्यात तसे पुरावे उपलब्ध आहे. अर्वाचीन काळात इतिहासकारांनी त्यांचा जीवनपट व बलिदानाचा इतिहास डोळ्यासमोर उपाधी दिली.

देशाला स्वाभिमान सूर्य वाटणाऱ्या छत्रपतींविषयी असे वक्तव्य करू नये. या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे निवेदन दिले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, सरचिटणीस अनिल बिराजदार, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा राणी राठोड, ज्येष्ठनेते दिलीपसिंह गौतम, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, शहराध्यक्ष किरण रामतिर्थे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...