आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राज्यपाल व भाजपचा निषेध करून  उस्मानाबादेत काँग्रेसकडून आंदोलन

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोशयारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाने जोरदार निदर्शने करून जोडे मारो आंदोलन केले.यावेळी “राज्यपाल कोश्यारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपचा धिक्कार असो” अशी घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजेंद्र शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डीसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, डॉ.स्मिता शहापूरकर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिलाताई उंबरे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पडवळ, ओबीसी विभागाचे अध्यक्ष धनंजय राऊत, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...