आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना केंद्र सरकारने गॅसचे दर ५० रुपयांनी वाढवून पुन्हा महागाईच्या खाईत लोटल्याचे काम केले. स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजत भाकरी-ठेचा सर्वसामान्यांना खाण्यासाठी देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
आमदार कैलास पाटील शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासह धाराशिव पंचायत समितीचे माजी सभापती संग्राम देशमुख व इतरांनी आंदोलनस्थळी भेट देत भाकरी व ठेचा खात आंदोलनास पाठिंबा दिला. याबाबत आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून मागील पाच वर्षांपासून सतत डिझेल, पेट्रोल व गॅस सिलिंडरची दरवाढ सुरू आहे. देश कोरोनामधून सावरत असतानाच पेट्रोलचे दर वाढवले. घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रूपयांनी महागले तर कमर्शियल गॅस सिलिंडर ३५० रूपयांनी महागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.