आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानळदुर्ग व अणदूर येथील महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होऊन तीन दिवस काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गावात अणि शेतातही शेतकऱ्यांना दिवसभर समस्यांचा सामना करावा लागला.
खाजगी कंपनीला वीज पुरवठ्यासाठी परवाना देऊ नये, तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजनको) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) मधील खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी संप पुकारण्यात आला. त्यात सहभागी होत नळदुर्ग येथील महावितरण कार्यालयात चार जानेवारीपासून ७२ तासांसाठी नळदुर्ग शहर व ग्रामीण तसेच अणदूर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
या संपामध्ये नळदुर्ग शहर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रवीण गायकवाड, नळदुर्ग ग्रामीणचे सचिन चाफेकर, शिवाजी सोनवणे, प्रसन्न कदम, विनोद चौधरी, सागर कौरव, अमोल डोंगरे, रामचंद्र सोळंके, पवन गुरव, गोरख चव्हाण, सतीश घोडके, पांडुरंग बुरजे, योगेश कुंभार, अंबादास काळे, अश्रुबा जगताप, नाना काळे, प्रशांत बोरामणे, कृष्णात रणखांब, राहुल कोळी, अशोक व्होगाडे, रेखा दुधाळकर व इतर सहभागी होते.
एेन यात्रा काळात संप
आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबाची यात्रा पाच ते सात जानेवारी दरम्यान मैलारपूर (नळदुर्ग) येथे होणार आहे. ऐन यात्रेच्या काळात नळदुर्ग महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत संप पुकारला आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात वीज पुरवठा विस्कळीत होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.