आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अपघातातील जखमी वारकऱ्यांसह मृतांच्या वारसांना आर्थिक मदत द्या; आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तुळजापुर तालुक्यातील कदमवाडी येथील ४ वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या वारसांना तसेच अपघातातील १९ जखमी वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत भरीव मदत करावी, अशी मागणी आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी तसे पत्र श्री. ठाकरे यांना दिले असून, त्याबद्दल ते सकारात्मक असल्याचेही आमदार घाडगे-पाटील यांनी सांगितले आहे.

कदमवाडी (ता.तुळजापूर) येथील वारकरी हे पंढरपूर येथे ट्रॅक्टरने प्रवास करुन दर्शनासाठी जात होते. वाटेत जाताना त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १९ वारकरी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी चार वारकरी हे अतिगंभीर अाहेत. त्यांची परिस्थिती नाजूक आहे. त्यांना उपचाराचा खर्च देखील पेलवण्याची आर्थिक स्थिती नाही. शिवाय मृत्यू पावलेल्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून त्यांना सावरण्यासाठी शासन म्हणून आपण मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे केली आहे. सहाय्यता निधीअंतर्गत या वारकऱ्यांना व मयत झालेल्या वारकऱ्यांच्या नातलगांना भरीव आर्थिक सहाय्य करून सहकार्य करावे, अशी विनंती आमदार घाडगे-पाटील यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...