आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 पीक नुकसानीचा विमा द्या; आमदार ज्ञानराज चौगुले यांचे विमा कंपनीला पत्र

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानीची रक्कम त्वरित वितरीत करण्याची मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, खरीप २०२० मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७२ तासात पूर्वसूचना दिली नाही म्हणून पीकविमा नाकारला. फक्त २० टक्के शेतकऱ्यांनाच पीकविमा देण्यात आला होता. हे शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असल्यामुळे मी औरंगाबाद खंडपीठात ६४/२१ अन्वये जनहीत याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल ६ मे २०२२ रोजी लागला. त्यानुसार न्यायालयाने सहा आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचा विमा कंपनीला आदेश दिला होता. चार आठवडे संपत आले तरी कंपनीतर्फे शेतकऱ्यांना विमा रकमेचे वितरण झाले नाही. खरिपाची पेरणी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन तातडीने खरीप विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी.

बातम्या आणखी आहेत...