आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवार संगीत मंडळ धाराशिव आणि सर्वेश पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथे पं. अप्पासाहेब जळगावकर संगीत समारोहाचे आयोजन” बाळ गोपाळ” सिद्धेश्वर जोशी जुना उपळा रोड यांच्या निवासस्थानी करण्यात आले याप्रसंगी गाणं सरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे पटशिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांनी त्यांची गायन कला सादर केली. त्यांना संवादिनीवर सुरेश फडतरे व तबला साथ हनुमंत फडतरे यांनी साथ संगत केली.
कार्यक्रमाची सुरुवात पं. आप्पासाहेब जळगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सुरुवातीला पणशीकरांनी किशोरीताईंचा भूप राग कसा असतो, त्याचे प्रत्यंतर दिले. विलंबित तीन तालामध्ये प्रथम “सूर साजे’ हा बडा ख्याल व नंतर किशोरीताईंनी अजरामर केलेली बंदिश ‘सहेला रे” गाऊन वातावरण भारावून टाकले. बंदिशीनंतर ‘देवाघरचे ज्ञात कुणाला” हे नाट्यगीत गाऊन नाट्यगीत व यमन राग कसा असावा याची अनुभूती दिली. त्यानंतर राघवेंद्र स्वामींचा कानडी अभंग तसेच पद्मनाभा नारायणा व बाजे मुरलिया हे हिंदी भक्ती गीत, त्यानंतर किशोरी ताईंची आवडती भैरवी योगा रंग एक झाला या अभंगांनी कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमामुळे जयपुर अत्रोली घराण्याचे गाणे कसे असते याचा आनंद रसिकांना घेता आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण जोशी, संजय देशपांडे ,डॉ. श्रीकांत कवठेकर ,महेश उंबरगीकर व इतरांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.