आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे तर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे सर्वच रस्तेच बंद झाल्याने किल्ल्यात शिवदुर्ग प्रेमी व सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यानी व रणरागिणीनी रविवार (दि. ३) गड संवर्धन जनजागृती तसेच किल्ला परिसरात वाढलेली झाडे-झुडपे, गवत काढुन मोठे परिश्रम घेत स्वच्छता मोहिम राबवून गडसंवर्धनाचा संदेश दिला.
या स्वच्छता मोहिमेत दुर्गप्रेमी बहाद्दर तरुणांचा मोठा सहभाग होता. या मोहीमेत कांही स्थानिक दुर्गप्रेमी युवक सहभागी होते.मध्ययुगीन स्यापत्यशास्ञाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन परंडा भुईकोट किल्ल्याची सर्वदुर मोठी ओळख आहे. आजही या किल्ल्यात मौल्यवान पंचधातू व इतर मोठ्या आकाराच्या लोखंडी तोफा असून, २६ बुरुजांनी भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यात अनेक प्राचीन अवशेष पाहण्यास मिळतात. इतिहासप्रेमी व विविध भागातुन आलेल्या पर्यटकांना समाधान मिळत आहे. मागील दोन वर्षापासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुईकोट किल्ला बंद होता. आतील सोलापूर, बार्शी,उस्मानाबाद सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींनी राज्य पुरातत्व विभागाची लेखी परवानगी घेऊन २७ फेब्रुवारी व ६ मार्च व ३ एप्रिल रविवार रोजी सलग तीन वेळेस भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम राबवुन पर्यटकांसाठीचे रस्ते,पथरस्ते चकाचक करुन मोकळे केले आहेत.
पर्यटकांना ही झाडे-झुडपे काढल्याशिवाय संपुर्ण किल्ला पाहता येणार नाही अशी दुरावस्था झाली होती. शिरुर शिवदुर्ग प्रेमी प्रतिष्ठान मध्ये ५७ शिक्षकवृंदाचा सहभाग होता.शिक्षकांनी गडसंवर्धनाची माहिती व स्वच्छता करीत आत्तापर्यंत ६५ गडावर मोहिम राबविली आहे. एकूण ५ बुरुजावरील तोफेच्या आजुबाजुचा काटेरी झाडांचा,गवताचा विळखा काढून सुस्थितीत तोफा ठेवल्या आहेत.प्रत्यक्षदर्शी पाहिले असता अतिशय कठीण ठिकाणी जीवाची पर्वा न करता काटेरी झुडपे हटविली आहेत. ती काढणे अशक्य होते. पण महत्वाचे होते. पुरातत्व विभागाकडून होणे अशक्य काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या बहाद्दर मावळ्यानी व रणरागिनी यांनी केले आहे.या स्वच्छता मोहिमेत छत्रपती शिवराय, हर हर महादेव नामाचा गजर करीत परिश्रम करण्यासाठी युवकात मोठी उर्जा निर्माण करीत होती.
सह्याद्री प्रतिष्ठाचे मावळे स्वःखर्चाने प्रवास करुन रविवारी सकाळी ८ पासून मोठे परिश्रम घेत आतील किल्ला भागातील स्वच्छता मोहिम दिवसभर राबविली. भुईकोट किल्ल्यातील असलेल्या शिवमंदीरच्या परिसरातील स्वच्छता केली.स्वच्छता मोहिमेत शहरातील शिवप्रेमी तरुणानी सहभागी व्हावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानचे निखील भुसारे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.