आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:कुंभारी येथे पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम प्रकल्पांतर्गत मौजे कुंभारी ता. तुळजापूर येथील बौद्ध समाजाने विकसित केलेल्या नालंदा बुद्ध विहाराच्या परिसरात, राजर्षी शाहू महाराज चौक, आंबेडकर नगर येथे प्रकल्पाची जनजागृतीसाठी एका पथनाट्याचे आयोजन केले होते. प्रवीण आर्ट ग्रुप घाटनजी ता. जि. यवतमाळ येथील कलाकारांनी ते सादर केले.

यामध्ये जमिनीचे आरोग्य सुधारावे,शेतकऱ्यांच्या पिकावर होणार खर्च कमी व्हावा,उत्पनात वाढ व्हावी,या करिता सेंद्रिय शेतीकडे वळणे जलसंधारणाची कामे, दिवसेंदिवस बिघडत चाललेले मानवी आरोग्य सुधारण्यासाठी विषमुक्त शेती व विषमुक्त भाजीपाला पिकवून समाजाचे पोषण वाढविणे कुपोषण कमी करणे,ऍनिमिया या सारख्या समस्या दूर करणे, स्त्री पुरुष समानता, महिलांवर होणारे कौटूंबिक अत्याच्यार दूर व्हावे,व्यसन मुक्ती, स्वछता,रोजगार,पायाभूत सुविधा आशा विविध विषयावर कुंभारी येथे पथ नाट्याच्या माध्यमातून वॉटर संस्थे अंतर्गत जनजागृती करण्यात आली.यावेळी वॉटर संस्थेचे तुळजापूर तालुक्याचे तालुका समन्वयक अमोल घोरपडे,प्रवीण आर्ट ग्रुप घाटनजी ता. जि. यवतमाळ येथील कलाकार प्रवीण सहारे, नरेश कुंटलवर,रुपेश राठोड,दशरथ तायडे ,गंगा ताई चिंचोलकर,वैशाली देशमुख,अयुब खान तसेच कुंभारी येथील प्रतिष्ठित नागरिक, महिला ,बालक,बालिका यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...