आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यसंग्रह:हणमंत पडवळ यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ; यशवतराव चव्हाण सभागृहात सोहळा झाला संपन्न

उस्मानाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपळे (मा) येथील तसेच जि. प. प्रा.शा.शेलगांव(ज.) ता.कळंब येथील शिक्षक उस्मानाबाद जिल्हा प्रा.शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महाराष्ट्र राज्य प्रा.शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते हणमंत सोपान पडवळ यांच्या “जगणे इथेच संपत नाही” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवतराव चव्हाण सभागृहात झाले.

कोल्हापूर येथील समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांच्या हस्ते या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे, तसेच लातूर येथील साहित्यिक योगीराज माने,जि.प.उस्मानाबादचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रामलिंग काळे, तेरणा अध्यापक विद्यालयाचे माजी प्राचार्य भालचंद्र हुच्चे,कमलताई नलावडे,हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठवाडा साहित्य परिषद् शाखा उस्मानाबाद चे अध्यक्ष नितीन तावडे हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे रवींद्र केसकर यांनी केले. डॉ रणधीर शिंदे यांनी समाजिक जीवनाचं प्रतिबिंब म्हणजे हा कविता संग्रह आहे असे मत व्यक्त करून काव्यसंग्रहाचे नवेपण विशद केले. साहित्यिक योगीराज माने म्हणाले की,कवीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कवीमध्ये असलेला नितळपण या संगळ्यांचा आरसा म्हणजे हा कविता संग्रह आहे.

बातम्या आणखी आहेत...