आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआई येडेश्वरी देवी मुख्य मंदिरावर येरमाळा ग्रामस्थांच्या वतीने चार महिन्यांपूर्वी साडेचार लाख रुपये खर्च करुन शुध्द पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला होता. मात्र, किरकोळ दुरुस्ती अभावी आता तो प्लांट शोभेची वस्तु बनल्याने भाविकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली. याचे देवस्थान ट्रस्टला कसलेही सोयरसुतक नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. देविच्या दर्शनासाठी तसेच वर्षातील प्रमुख तीन यात्रा महोत्सवासाठी संपूर्ण मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ तसेच कर्नाटक, गुजरात, आंध्र आदी राज्यातून लाखो भाविक दाखल होत असतात तसेच चैत्र,वैशाख, ज्येष्ठ महिन्यांमध्येही मोठी गर्दी असते. यासाठी देवस्थान ट्रस्ट तगडे नियोजन असते.
पण, भाविकांना शुध्द पाणी पुरवठा करणे जोखमीचे असल्याने मानकरी अमोल पाटील यांनी येरमाळा ग्रामस्थाकडून श्री येडेश्वरी देवीला गावभोगीतून उरलेल्या रकमेतून शुद्ध पाण्याचा आरओ प्लांट बसवण्याची संकल्पना दिली. ग्रामस्थांच्या सहभागातून तसेच श्री येडेश्वरी देवीची गावभोगीतील शिल्लक रक्कम असे मिळुन साडेचार लाख रुपयाचा पिण्याच्या शुध्द पाण्याचा प्रकल्प (सतत दोन हजार लिटर पाणी शुध्द व थंड क्षमतेचा आरओ प्रकल्प ) उभा करण्यात आला.
त्याचे नववर्षाच्या मुहूर्तावर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आई श्री येडेश्वरी देवीच्या चरणी अर्पणही करण्यात आला होता. परंतु प्रकल्प उभा करुन चार-पाच महिने झाले असून प्रकल्प किरकोळ कारणावरून सतत बंद असल्याचे दिसुन आले. एक-दोन वेळेस मानकरी तथा ग्रामस्थांनी प्रकल्प बंदची घटना देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.
पण, आम्ही लक्ष देऊ असे म्हणत विषय संपवला. सध्या देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होत असुन भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नाही. भाविकांची हेळसांड तर होतच आहे. पण, अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी देवस्थान ट्रस्टने याकडे तत्काळ लक्ष देऊन भाविकांना पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.