आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:वांगी(खु) सरपंचपदी पुतळा गुंजाळ तर वारेवडगांव-कासारी च्या सरपंच पदी महेंन्द्र गायकवाड यांची निवड

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील वांगी(खु) व वारेवडगांव - कासारी या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे निकाल तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे यांनी जाहिर करताच दोन्ही गावातील विजयी उमेदवारांसह समर्थकांनी तहसिल कार्यालय, पंचायत समिती समोर गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तालुक्यात पाच वर्षापुर्वी थेट जनतेतून निवडणूक झालेल्या वांगी(खु) व वारेवडगांव-कासारी या दोन गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका थेट जनतेतून सरपंच पदासाठी घेण्यात आल्या आहेत.

वांगी (खु) येथील ग्रामपंचायतच्या मतमोजणीतसरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला या जागेवर पुतळा शशिकांत गुंजाळ -५९१ मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या विरोधातील सुनिता हनुमंत गुंजाळ यांना ४०९ मते मिळाली.तसेच सदस्य पदासाठी राणी महादेव गुंजाळ यांनी १६२ मते मिळवून विजय मिळवला. त्यांच्या विरोधातील प्रमिला ज्ञानदेव शिंदे यांना १४४ मते मिळाली. तसेच ज्ञानेश्वर भिमराव ढगे यांनी १६६ मते घेऊन विजयी मिळविला तर त्यांच्या विरोधातील नानासाहेब सोपान वाघमारे १३८ मते मिळाली. तसेच विठ्ठल सुभाष सुके यांना २४३ मते घेऊन विजयी मिळविला तर त्यांच्या विरोधातील नवनाथ संभाजी गुंजाळ यांना १७५ मते मिळाली.

तसेच सारिका निवृत्ती बरवे २४१ मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विरोधातील विजया विश्वनाथ शिर्के यांना १६९ मिळाली. वांगी ( खु ) येथील तीन सदस्य सुरेखा शिवाजी वाघमारे, कविता दिलीप पवार व रामेश्वर देविदास गुंजाळ हे बिनविरोध निवडून आले आहेत. वांगी(खु) येथील नवनिर्वाचित सरपंच पुतळा शशिकांत गुंजाळ यांनी आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली विजयी संपादन केल्याचे जाहिर केले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) बालाजी गुंजाळ यांची उपस्थिती होती.

तसेच तालुक्यातील वारेवडगांव - कासारी येथील ग्रामपंचायतच्या निवडणूकीत ह.भ.प.विश्वनाथ महाराज ग्रामविकास सर्व पक्षीय पॅनलचा विजय झाला असून सरपंचपदी महेन्द्र वामन गायकवाड यांनी ५४९ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील मोहन शंकर गायकवाड यांना ३८४ मते मिळाली. येथील आठ सदस्य यापुर्वीच बिनविरोध निवडून आल्याने येथे एका सदस्याच्या जागेसाठी निवडणूक झाल्याने याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाअध्यक्ष तानाजी भाऊराव पाटील यांनी २२३ मते घेऊन विजयी झाले तर त्यांच्या विरोधातील अशोक गोरोबा पाटुळे यांना केवळ ६१ मते मिळाली.

या ग्रामपंचायतच्या निवडणूकीत बिनविरोध सदस्य सरीता दत्ता नलवडे,विकास नवनाथ करवंदे,आंकुश जयसींग नलवडे, वर्षा आशोक नलवडे, पदमीन चंद्रकांत सपकाळ, रामहारी मिसाळ,पमलबाई मोहन गायकवाड, उषा नवनाथ राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे. वारेवडगांव- कासारी येथील ह.भ.प.विश्वनाथ महाराज ग्रामविकास सर्व पक्षीय पॅनलचे प्रमुख जयसिंग नलवडे ,पंढरी डिसले ,विकास करवंदे यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.व्ही.शिंदे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...