आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांना साहित्य पुरस्कार; अविनाश पासष्ठी गझल संग्रहाला पुरस्कार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाविष्कार अकादमी उस्मानाबाद यांच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार ज्येष्ठ साहित्यिक कै.श.मा. पाटील यांच्या नावे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय लिखाणासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार साठी राज्यभरातून मोठ्या संख्येने साहित्य कृती प्राप्त झाल्या होत्या.

तज्ञ परिक्षकांकडून परीक्षण करून त्यापैकी 'अविनाश पासष्टी' या गझल संग्रहाची निवड पुरस्कार साठी करण्यात आली आहे.सदरच्या गझलसंग्रहाचे लेखक पुणे येथील प्राचार्य डॉ .अविनाश सांगोलेकर हे कविवर्य सुरेश भट यांचे सोबत "काफला’ या प्रातिनिधिक मराठी गझल संग्रहाचे संपादन करणारे व मराठी गझल चे आद्यसंशोधक म्हणून ओळखले जातात.

ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे प्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख राहिले आहेत. लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे उपाध्यक्ष ॲड. राज कुलकर्णी सचिव शेषनाथ वाघ व कार्यकारिणी मंडळाने जाहीर केले आहे .

बातम्या आणखी आहेत...