आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल:कुरेशी गल्ली गोवंशीय जनावरांची बेकायदेशीररीत्या कत्तल, पोलिसांचा छापा

नळदुर्ग6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग येथील कुरेशी गल्लीत बेकायदेशीर रित्या गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यात येत होती. या कत्तली च्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून ८५० किलो गोवंशीय मांस व तीन जिवंत गोवंशीय जनावरे असा एकुण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी ही कारवाई करुन सहा जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २४ जुलै रोजी सकाळी ६.४५ वाजता उस्मानाबाद येथून आलेल्या पोलिसांनी कुरेशी गल्लीतील बेकायदेशीर सुरु असलेल्या गोवंशीय जनावरांच्या कत्तल खाण्यावर धाड टाकली. पोलिसांनी ही कारवाई नियोजनबद्ध पद्धतीने केल्याने आरोपींना पलायन करता आले नाही. यावेळी निजाम कुरेशी वय ३२, मेहमूद कुरेशी वय ३९, अरबाज कुरेशी वय २३, सादिक कुरेशी वय ३०, मुन्ना कुरेशी वय ३०, मुदस्सर कुरेशी वय १९ सर्व रा. कुरेशी गल्ली हे संगनमत करून गोवंशीय जनावरांची कत्तल करतांना आढळुन आले. यावेळी आरोपींकडून ८५० किलो मांस व तीन जिवंत गोवंशीय जनावरे जप्त केली.

याबाबत संदीप शहाजी ओहोळ पोलिस उपनिरीक्षक पोलिस नियंत्रण कक्ष उस्मानाबाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबतचा पुढील तपास पोहेकॉ उमाजी गायकवाड हे करीत आहेत. इतक्या मोठ्याप्रमाणात गोवंशीय मांस आढळुन आल्याने येथून मासाची बाहेर निर्यात होत असल्याचा संशय बळावत आहे. पोलिसांनी अशा प्रकारचे वारंवार गोहत्याबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

१७ दिवसांत तीन ठिकाणी कारवाई
पोलिसांनी नळदुर्ग येथे वेगवेगळ्या ठिकाणी १७ दिवसात कारवाई केल्या. सात जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गोवंशीय जनावरांची सुटका केली. त्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी १० जुलै रोजी येडोळा परिसरात छापा टाकून कत्तली-साठी बांधून ठेवलेल्या १५ गायींची मुक्तता केली होती. त्यानंतर आज पुन्हा कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...