आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:रब्बी हंगाम बहरात पण रोगाचा प्रादुर्भाव,‎ दुसरीकडे वन्यप्राण्यांकडून होते नासाडी‎

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎ यंदाच्या वर्षातील खरीप हंगाम सततचा‎ पाऊस, अतिवृष्टी व परतीच्या‎ पावसामुळे उत्पन्नात कमालीची घट‎ झाली. उत्पन्न जेमतेमच निघाल्याने‎ शेतकऱ्यांनी झालेले नुकसान भरून‎ काढण्यासाठी रब्बीच्या पेरणीला सुरुवात‎ केली. वातावरण बदल व धुक्यामुळे‎ रब्बी हंगाम ही संकटात सापडला असून‎ एकीकडे कीड रोगाचा प्रादुर्भाव व‎ दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या नासाडीने‎ शेतकरी संकटात आलेला आहे.‎ तालुक्यात खरीप हंगाम अतिवृष्टी‎ आणि परतीचे पावसात गेल्यानंतर रब्बी‎ हंगामात मुबलक उत्पन्न निघण्याची‎ आशा लागली असताना जवळपास‎ शंभर टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या, मात्र‎ वातावरणातील बदल, धुक्याने किड‎ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी‎ पुन्हा संकटात आलेला. सध्या हरभरा व‎ ज्वारीचे पिक सुकून जात असल्याने‎ पिके माना टाकायला सुरुवात केली.‎ शेतकऱ्यांनी पिके जगविण्यासाठी तुषार‎ सिंचनाचा वापर करत पिक जगवण्याची‎ धडपड सुरू केली आहे.

यंदाच्या वर्षात‎ पावसाने शेवटचे टप्प्यात दोन वेळा‎ झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी‎ पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला,‎ तुरीच्या मोसमात बुरशीजन्य रोगाने फक्त‎ काळवंडल्याने मुबलक उत्पन्नाची आशा‎ वातावरण बदलाने मावळली. वातावरण‎ बदलाचा फटका रब्बीच्या हंगामातील‎ पिकांना ही बसत आहे. सध्या ज्वारी व‎ हरभरा पिक बहरात असताना पदरमोड‎ करीत शेतकऱ्यांनी महागडे औषधीची‎ खरेदी करत फवारणी केली आहे.‎ अतिवृष्टीमुळे पेरण्याला विलंब होत‎ असल्याने निसर्गाच्या भरवस्यावर‎ शेतकऱ्यांनी निर्धारित क्षेत्रापेक्षा सर्वाधिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ क्षेत्रात रब्बीची पेरणी केली.‎ दिवसभर ढगाळ व पहाटेच्या सुमारास‎ होणाऱ्या धुक्यामुळे हरभरा पिकांवरील‎ घाटे व हिरव्या अळी रोगाचा प्रादुर्भाव‎ झाल्याने शेतकऱ्यांनी पदरमोड करीत‎ औषध फवारणी करून पिके‎ जगविण्याची धडपड सुरू असताना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वन्यप्राणी यांच्या नासाडीने शेतकरी दुहेरी‎ संकटात सापडलेला आहे.‎

वन्यप्राण्यांमुळे ज्वारी, हरभरा पिके‎ हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना‎ लागली असताना हरीण, वानर व‎ रानडुक्कर या वन्यप्राण्या कडून हरभरा,‎ ज्वारी पिकांची नासाडी होत आहे. ज्वारी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बहरात व हरभरा फूल-फळधारणेत‎ असताना पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव‎ होत असून निसर्गाच्या भरवशावर‎ महागडे बियाणे, खते खरेदी करून पेरणी‎ केली. दरम्यान तालुक्यात शेतकरी‎ पिकांना जिवनदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत.‎

१२० टक्के क्षेत्रात हरभरा‎
तालुक्यात यंदा रब्बी पेरणीचे ४४ हजार‎ ६०० हेक्टर क्षेत्र असून जवळपास शंभर‎ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे.‎ पीकनिहाय क्षेत्र व कंसात पेरणी झालेले‎ क्षेत्र पुढीलप्रमाणे ज्वारी एकूण १६ हजार‎ सातशे हेक्टर (९५००), गहू एकूण पेरणी‎ क्षेत्र दोन हजार ४७५ हेक्टर (२६३५),‎ हरभरा एकूण २० हजार ८४५ हेक्टर‎ क्षेत्रापैकी २४ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रात‎ म्हणजे १२० टक्के पेरणी झाली आहे.‎ करडई एकूण पेरणीचे क्षेत्र तीन हजार १४‎ हेक्टर (२९५२), जवस ४१४ हेक्टर क्षेत्र‎ तर सूर्यफूल एक हजार ४७० हेक्टर तर‎ बाराशे हेक्टर क्षेत्रात इतर पिकांचा पेरा‎ झाला आहे.‎

वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी !,वनविभागाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी‎
यंदा वेळेवर पाऊस झाल्याने तालुक्यात बहुतांश क्षेत्रावरती‎ पेरण्या झाल्या असून शेतशिवारात पिके जोमात आलेली‎ असलीतरी मुळज, एकुरगा, कोरेगांव, येणेगुर, माडज आदी‎ परिसरात वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने हरणासह‎ वानरांचे कळप चाऱ्याच्या शोधात शिवारात भटकत असून‎ कोवळ्या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात करीत आहेत.‎ निसर्गाच्या दुष्ट चक्रात अडकलेला शेतकरी वन्यप्राण्यांच्या‎ कडून होत असलेल्या पिकांच्या नासाडीमुळे हतबल झाला‎ आहे. याबाबत मुळजचे शेतकरी नागेश बिराजदार म्हणाले,‎ खरिप हंगाम पावसाने वाया गेला, रब्बीचे बऱ्यापैकी उत्पन्न‎ निघेल या आशेने पेरणी केली. रब्बी पिके चागली बहरात आली‎ आहेत. मात्र शेतात वन्यप्राण्याचा हैदोस सूरु असल्याने नवीन‎ संकट उभे राहिले आहे. शेतात वन्यप्राणी पळविण्यासाठी‎ विविध प्रयोग करीत असूनही ते निष्फळ ठरत आहे. यावर्षी रब्बी‎ हंगामातील खर्च निघणार की नाही याची शाश्वती वाटत नाही.‎ तरी वन्य प्राण्यापासून पिकांचा बचाव करण्यासाठी जीव‎ धोक्यात घालून रात्री थंडीत शेती जागल करत पिकांची राखण‎ करावी लागते आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा‎ पिकांना फटका बसत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा‎ बंदोबस्त करावा.‎

बातम्या आणखी आहेत...