आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवा राज्यात निर्मिती केलेली बनावट विदेशी दारू अवैधरीत्या विक्रीसाठी घरात साठवून ठेवली होती. शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीसह एक लाख ६३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई होळी तांडा (ता. लोहारा) येथे करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त पी. एच. पवार यांच्या आदेशानुसार आणि उस्मानाबादचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कार्यालयाने शनिवारी होळी तांडा येथील आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी गोवा निर्मित व गोवा राज्यात विक्रीस असलेले दारुचे २२ बॉक्स मध्ये एकूण एक हजार ५६ बाटल्या अवैधरीत्या विक्रीसाठी आणल्याचे आढळून आले. उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने हा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच उत्तम माणिक राठोड (५२) रा. होळी तांडा यास अटक करुन त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
त्यास प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दुय्यम निरीक्षक एस. बी. शिंदे पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई तुळजापूर निरीक्षक एस. जी. भवड, उस्मानाबाद-लातूर निरीक्षक तानाजी कदम, प्र. निरीक्षक प्रदीप गोणारकर, निरीक्षक रघुनाथ कडवे, दुय्यम निरीक्षक चरणसिंग कुंठे, प्रभाकर कदम, सुमित चव्हाण, कर्मचारी राजेंद्रसिंह ठाकुर, विनोद हजारे, झुंबर काळे, सुरेश वाघमोडे, अभिजीत भोंगाणे, अविनाश गवंडी, तुषार नेर्लेकर, कोंडिबा देशमुखे, बालाजी भंडारी, महेश कंकाळ व राजेश गिरी यांचा पथकात समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.