आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:जुगार अड्ड्यावर धाड, 3 लाख मुद्देमालासह 12 जण ताब्यात

उमरगा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अंतुबळी पतंगे सभागृहाच्या परिसरात शनिवारी (११) सायंकाळी एका घरात तीन पत्ते जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल बारा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रकमेसह आठ दुचाकी असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल उमरगा पोलिसांनी जप्त केला. तसेच बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील अंतुबळी पतंगे सांस्कृतिक सभागृहाच्या पाठीमागे प्रदीप मोरे यांच्या राहत्या घरासमोर तीन पत्ती जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. जाधवर यांच्या पोलिस पथकाने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी तीन पत्त्याचा तिर्रट नावाचा जुगार खेळताना बारा जण दिसून आले. यावेळी जुगारात सापडलेली ३३ हजार ४३० रुपये रोख आणि आठ दुचाकी असा तब्बल तीन लाख एक हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी सापडलेला मुद्देमाल व बारा जणांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

यावेळी पोलिस नाईक अतुल मुकुंद जाधव यांच्या फिर्यादीवरून प्रदीप मोरे (२८), विजयकुमार हेरुरे (२४), प्रदीप सूर्यवंशी (२२) विजय माने (२९), खादिर वाडीकर (३७), बालाजी माळी (३८), सिराज शेख (३०), मारुती देवकर (३७), हणमंत दंडगुले (३६), दत्ता पवार (३५), संजय उपासे (४०) (रा सर्व उमरगा), अभिजित सूर्यवंशी (३२ रा मुळज उमरगा) अशा बारा जणांवर शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज सोमवंशी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...