आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला:जुगार अड्ड्यावर छापा ; आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस नियंत्रण कक्षचे पथक गस्तीवर असताना रविवारी उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यावर बावी शिवारातील उतमी रस्त्यालगत वाघमारे यांच्या शेतात काही इसम जुगार खेळत असल्याचे कळले.

तेथे छापा टाकला असता राहुल भांडवले, शुभम डांगे, जगदीश माने, सचिन बेंद्रे सर्व रा. गणेशनगर, उस्मानाबाद, बाळासाहेब गाडेकर, सोमनाथ दाने, दोघे रा. सांजा, सचिन वाघमारे, रा. समतानगर, सतीश बन, रा. तेर, सुरज बनसोडे, रा. काठी, ता. तुळजापूर, अमोल मगर, रा. वाघोली हे सर्व लोक टिर्रट नावाचा जुगार खेळत होते. अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह एक कार, तीन मोटारसायकल, नऊ मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण आठ लाख ६२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...