आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिग्गी शिवारात एका शेतात पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पळून गेलेल्या दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक मनोज राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने डिग्गी येथे संजय पवार यांच्या शेताच्या बाजुला गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने गावठी दारू बनवणारे दोघे साहित्य तेथे टाकून पळाले.
पोलिसांना दोनशे लिटर क्षमतेचे सात लोखंडी बॅरल व दोन प्लास्टिकचे बॅरेल, १८० लिटर गुळमिश्रित रसायन, एक हजार लिटर क्षमतेचा एक प्लास्टिकचा बॅरलमध्ये ९०० लिटर गुळ मिश्रित रसायन आढळले.
गुळमिश्रीत रसायन एकूण किंमत एक लाख २६ हजार, दहा किलो वजनाचे गुळाच्या १८० ढेप एकूण किंमत ७२ हजार, चार प्लास्टिकच्या घागरीत प्रत्येकी दहा लिटर व एक रबरी ट्यूबमध्ये ५० लिटर असे एकुण ७२०० रुपयाची ९० लिटर दारू असा एकूण दोन लाख पाच हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी पळून गेलेले संजय पवार, खलील जमादार (दोघे रा. डिग्गी, ता. उमरगा) या दोघांविरोधात गुन्हा नोंद केला. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर, लक्ष्मण शिंदे, जयहरी वाघुलकर, बाबा कांबळे, संभाजी घुले, बालाजी कामतकर व कर्मचाऱ्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.