आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापे:अवैद्य मद्य विरोधात 17 ठिकाणी छापे

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी नवीन वर्षांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर पोलिसांच्या वतीने अवैध मद्य विक्री आणि निर्मिती अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकत १७ जणांवर गुन्हे दाखल केले. तसेच त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत नाशवंत हातभट्टी रसायन ओतून दिले.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून शनिवारी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मितीचा सुमारे सहा हजार २१० लिटर आंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट केला. तसेच ३३७ लि. गावठी दारु व देशी-विदेशी दारुच्या एकुण १४३ सीलबंद बाटल्या, असे मद्य जप्त केले.

ओतून दिलेला मद्यार्क निर्मितीचा द्रवपदार्थासह मद्य निर्मिती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रित किंमत अंदाजे तीन लाख आठ हजार ४० रुपये आहे. यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. उमरगा पोलिस ठाणे पथकाने पाच ठिकाणी, शिराढोण पोलिसांनी रांजणी गावात, ढोकी पोलिसांनी ढोकी गावात, उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकांनी तीन ठिकाणी, लोहारा पोलिस ठाण्याच्या पथकांनी होळी गावात तर अंबी पोलिसांनी उंडेगावात छापा टाकत ही कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...