आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सात ठिकाणी छापे; पाचशे लिटर दारु जप्त

उस्मानाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती आणि विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून सद्या छापा सत्र सुरु करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या अंतर्गत बुधवारी सात ठिकाणी छापे टाकून पाचशे लिटर पेक्षा जास्त दारु जप्त करुन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पाच पोलिस ठाण्याच्या पथकांनी कारवाई करुन सात जणांवर गुन्हे दाखल करुन अनेकांना ताब्यात घेतले आहेत.

तसेच त्यांच्याकडून दारु ही जप्त केली. नुसार वाशी आणि ढोकी पोलिस ठाण्याच्या पथकांनी प्रत्येकी दोन ठिकाणी छापे टाकले. तसेच मुरुम, तामलवाडी आणि उमरगा पोलिस ठाण्याच्या पथकांनी प्रत्येकी एक ठिकाणी छापा टाकत ही कारवाई केली. या कारवाई घटनास्थळावर आढळलेली १४८ लिटर गावठी दारु, १०० लिटर ताडी हा अंमली द्रव व देशी- विदेशी दारुच्या २६४ सीलबंद बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...