आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनांचा आढावा:रेल्वे प्रकल्प, प्रशाद योजनेतून तुळजापूरचा विकास, टेक्सटाइल पार्कसाठी स्वत: प्रयत्न

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे प्रकल्प, तुळजापूर तीर्थक्षेत्राचा प्रशाद योजनेतून विकास करणे, जिल्ह्यासाठी टेक्सटाइल पार्क उभारण्यासाठी व्यक्तिश: प्रयत्न करणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मुबलक निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

डॉ. कराड यांनी जिल्ह्यात विविध योजनांबाबत आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार दुष्यंतकुमार गौतम, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मिलींद पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी आदी उपस्थित होते. डॉ. कराड म्हणाले की, सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेसाठी आतापर्यंत ३० कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. राज्य सरकारकडून अद्याप निधी देण्यात आला नाही. पुढेही केंद्राकडून सर्वाधिक निधी उपलब्ध करण्यात येईल. तुळजापूर तिर्थक्षेत्राचा प्रशाद योजनेत समावेश करून विकास केला जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना अहवाल तयार करण्यास व कोणत्या बाबींची गरज आहे, यासंदर्भात माहिती देण्यास सांगितले आहे. याचाही अहवाल केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. यासोबत आता “वन डिस्ट्रीक्ट, वन प्रोजेक्ट’ योजनेअंतर्गत टेक्टाईल पार्क उभे केले जाईल. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सौरउर्जेच्या प्रकल्प उभारणीचाही प्रयत्न केले जातील. यासोबतच तुळजापूर तालुक्यातील तिर्थ (बुद्रुक) येथे शेळी मेंढी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. तसेच येथे उस्मानाबादी शेळीचा संशोधन प्रकल्प उभा केला जाणार आहे. यासर्व प्रकल्पांसाठी भरघोस निधी उपलब्ध करण्यात येईल. यासाठी आपण व्यक्तीगत स्तरावर लक्ष देऊन प्रयत्न करणार आहे, असेही डॉ. कराड यांनी सांगितले. विरोधकांचा दबाव यावेळी दुष्यंतकुमार गौतम म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे अगोदरच सांगितले हाेते. त्यानुसार ईडीसह अन्य तपास यंत्रणा कारवाया करत आहेत. परंतु, आंदोलन करून काँग्रेस तपास यंत्रणांवर दबाव आणत आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त शासन हवे आहे, यासाठीच देशभर भ्रष्ट नेत्यांवर कारवाया सुरू आहेत. विरोधकांनी ईडीसह अन्य यंत्रणांना काम करू द्यावे, विनाकारण दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. “मुद्रा’तून नवीन कर्ज द्या जिल्ह्यात सद्यस्थितीत ३४ टक्के पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. आणखी मोठ्याप्रमाणात कर्ज वाटपास सांगण्यात आले आहे. मुद्रा योजनेमधून केवळ रिनिव्हलवर भर न देता युवकांना नवीन कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासोबतच जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, विमा योजना, पेन्शन योजना आदींचीही कामे करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.

डॉ. कराड म्हणाले... {औरंगाबादचा असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याच्या विकासाची माझी व्यक्तिश: जबाबदारी. {मराठवाडास्तरावर पुन्हा दोन महिन्यांनी बैठक घेऊन दिलेल्या निर्देशांचा आढावा घेणार. {नीती आयोगाचा आक्षांकित जिल्हा म्हणून उस्मानाबादवर विकासासाठी अधिक लक्ष देणार. {जिल्ह्यातील महिला-पुरुष जन्मदराच्या गुणोत्तरात समानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न. {केवळ सातबारा, किसान क्रेडिट कार्ड योजनेतून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार. {कोणत्याही प्रकारचा अर्ज जरी आला तरीही बँकांनी कर्ज देण्याबाबत दिल्या सूचना.

जिल्ह्याच्या गरजेनुसार केंद्राला अहवाल देणार जिल्ह्यात निती आयोगाच्या इंडिकेटरमध्ये चांगले काम होत आहे. शिक्षणात २७, आरोग्य कार्यक्रमात ५४, शेती - सिंचनात २०, अार्थिक नियोजनात ७९ तर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात जिल्ह्याचा देशात ९१ वा क्रमांक आहे. काही क्षेत्रांमध्ये काम करण्याची गरज आहे. जिल्ह्याला आणखी कशाची गरज आहे. याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.

जिल्ह्यास मिळणार १२ बँकांच्या शाखा डॉ. कराड म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा सुरू करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. जवळपास ३६ गावांमध्ये शाखा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बँकांच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सर्वच ठिकाणी शाखा सुरू करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली नाही. तूर्त १० ते १२ ठिकाणी शाखा सुरू करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

देशातील वातावरण बदलले दुष्यंतकुमार म्हणाले, काँग्रेसच्या काळात रेल्वे, बसमध्ये कोणतीही वस्तू बाँब असू शकते, असे फलक लावले जात होते. सातत्याने बाँबस्फोट घडून अनेकांचे मृत्यू झाले. मोठ्या शहरात बाजारात गेलेला माणूस सुखरूप घरी येईल का, याची शाश्वती नव्हती. परंतु, आता देशातील वातावरण नरेंद्र मोदी यांच्या कणखरतेमुळे सुरक्षित झाले आहे. अतिरेकी कारवाया बंद झाल्या आहेत. व्यक्ती मुक्तपणे, निर्भयतेने कोठेही फिरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...