आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पाऊस:तुळजापूर, वाशी, कळंब, परंड्यातील गावांत पाऊस; येडशी परिसरास पावसाने झोडपले

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील येडशी परिसरात शनिवारी (दि.३०) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अवघ्या काही मिनिटांत सर्वत्र पाणीच पाणी झाले. दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र उस्मानाबाद शहरात हा पाऊस नव्हता. शनिवारी येडशी, तुळजापूर, कळंब, वाशी व परंडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.

या पावसाने नदी,नाले भरून वाहून लागले आहेत. येडशी परिसरातील तलावांना यामुळे पाणी आले आहे. परिसरातील सोनेगाव, भानसगाव, कारी आदी गावांमध्येही मोठा पाऊस पडल्याने ओढे, नद्यांना पाणी आले होते.

बातम्या आणखी आहेत...