आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाली तुंबल्यामुळे रस्त्यावर साचले तळे:उस्मानाबादेत पावसाची हजेरी; रोडवर पाणी साचल्यामुळे वाहतूकही खोळंबली

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबादेत दोन दिवसांच्या खंडानंतर मंगळवारी (दि.२) दुपारी दोनच्या सुमारास अर्धा तास दमदार पाऊस झाला. यामुळे शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या दक्षिण बाजुच्या रस्त्यावर पाण्याचे तळे साचले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यानही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे वाहतुकीस काही वेळ अडचण आली.

उस्मानाबादेत नाल्या मोठ्या प्रमाणात तुंबल्या असून पावसाने लगेच रस्त्यावर तळे साचते. जिल्हा परिषद व शासकीय विश्रामगृहाच्या मधील रोडवर पाणी साचले होते. विश्रामगृहालगतची नाली कचऱ्याने भरल्याने पावसाचे पाणी वाहून गेले नाही. छत्रपती शिवाजी माहाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यादरम्यान रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली.

रस्ते माखले चिखलाने
उस्मानाबादेत मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागात जोरदार पावसाने ओढे, नद्यांना पूर आला होता. मात्र शहरात पावसाचा पत्ता नव्हता. मंगळवारच्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. पावसाने उस्मानाबाद शहरातील अनेक रस्ते पुन्हा चिखलमय झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...