आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लौकिक:सामान्य कुटुंबांतील मुलांनी वाढविला लौकिक ; आदर्श संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचे यांचे गौरवोद्गार

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक शेतकरी, शेतमजूर व मध्यवर्गीय कुटुंबातील मुलांनीच भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाची गुणवत्ता आणि संस्थेचा लौकीक वाढविला असून, अशा सामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे गौरवोद््गार आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी काढले. संस्थेचा लातूर विभागात गुणवत्तेचा आलेख कायम असून, पुन्हा एकदा लातूर नव्हे तर उस्मानाबाद पॅटर्नचा ठसा उमटल्याचे त्यांनी सांगितले. बारावीला विज्ञान शाखेत भोसले कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या दोन मुलींनी लातूर विभागात अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळविला असून, या मुलींसह तिन्ही शाखेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा के.टी.पाटील डी.फार्मसी महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रशिक कांबळे हीने प्रथम तर आश्लेषा देशमुख हीने दुसरा क्रमांक मिळविला. यासंदर्भात माहिती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य एस.एस.देशमुख,संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, उपप्राचार्य एस.के.घार्गे, पर्यवेक्षक टी.पी.हाजगुडे, कला वाणिज्य विभाग प्रमुख एन.आर.नन्नवरे, फोटॅान प्रमुख भगत सर,फेनोमीनल प्रमुख जे.एस.पाटील आदींची उपस्थिती होती. पाटील म्हणाले, लातूर विभागात प्रमुख महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख तपासल्यानंतर उस्मानाबादेतील भोसले कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल सरस असल्याचे समोर आले आहे. यावेळी विज्ञान शाखेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या एकूण ७० विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ९९.६५ टक्के निकाल विज्ञान शाखेमधून ८७८ विद्यार्थ्यानी परीक्षा दिलेली होती.त्यापैकी ८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.सरासरी निकाल ९९.६५ टक्के असून पैकी ७७२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजमधून प्रथम क्रमांक प्रशिक अतिश कांबळे(५७४ गुण ९५.६७ टक्के), व्दितीय अश्लेषा देशमुख (५६६ गुण ९४.३३ टक्के) तसेच तृतीय क्रमांकाचे एकूण ३ विद्यार्थी समान गुण घेतलेले विद्यार्थी काजल भोसले (५६१ गुण ९३.५ टक्के), नम्रता गाडे(५६१ गुण ९३.५ टक्के), जव्हेरीया मोहम्मद फीरोज मोमीन (५६१ गुण ९३.५ टक्के) आहेत. तसेच कला शाखेतून २०८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सरासरी निकाल ९०.३८ टक्के आहे. कॉलेजमधून प्रथम क्रमांक राजश्री सावंत, व्दितीय जान्हवी विजयकुमार पेठे, तृतीय सोनम विष्णू यादव,तसेच वाणिज्य शाखेतून १७७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९६.०४ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक ऋतुजा कांबळे,व्दितीय क्रमांचे समान गुण असलेले २ विद्यार्थी निकीता डोंगरे व प्रतिक्षा उगले, तृतीय क्रमांक प्रतिक भगवत तौर आहेत.

बातम्या आणखी आहेत...