आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:राज्यसभा निवडणूक विजयाचा मुरूम येथे जल्लोष

मुरुम17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिनही उमेदवारांनी विजय मिळवला. यामुळे शनिवारी (दि. ११) मुरूम शहरात भाजपच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष गुलाब डोंगरे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात पूजन करुन श्रीफळ अर्पण करण्यात आले. त्यानंतर अशोक चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करुन व पेढे भरवत जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार, शहर उपाध्यक्ष शरणप्पा मुळे, ज्येष्ठ नेते शिवशंकर ब्याळे, सिद्राम सोनटक्के, झाकीर जमादार, दिलीप नलावडे, विशाल व्हनाळे, गणेश डोंगरे, पृथ्वीराज गव्हाणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...