आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रसेविका समिती शाखेच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर विद्यालयातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या व शुभेच्छा कार्ड सीमेवरील जवानांना पाठवण्यात आले. देवगिरी प्रांतांतर्गत हा उपक्रम शनिवारी (३०) राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या मार्गदर्शक रजनी महाजन यांच्या उपस्थित संपन्न झाला.
महाजन म्हणाल्या, सीमेवर जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांबद्दल आदर आणि स्नेहभाव बाळगला पाहिजे. जवान डोळ्यात तेल घालून सीमेवर रक्षण करतात म्हणून आपण मुक्तपणे वावरतो. या जवानांना समितीच्या वतीने येणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त राख्या व शुभेच्छा कार्ड पाठवून सन्मान व्यक्त करत असतो. हे सैनिक रक्षाबंधनासाठी गावी येऊ शकत नाहीत म्हणून हा उपक्रम समितीच्या वतीने दरवर्षी राबवला जातो. या कार्यक्रमासाठी समितीच्या सदस्या नयना इंदापूरकर, मुख्याध्यापिका सविता लोहार उपस्थित होत्या. शाळेतील विद्यार्थिनी कडून आकर्षक राख्या आणि भेटवस्तू बनवण्यासाठी ज्योत्स्ना पाटील, सुमन कुवर, सुरेखा नारायणकर, रुपाली पोतदार यांनी मार्गदर्शन केले. महात्मा बसवेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ६४० राख्या व २७ शुभेच्छा कार्ड बनवले होते. या कार्यक्रमात संगीता पतंगे यांनी देशभक्ती गीत सादर केले. रूपाली पोतदार यांनी प्रास्ताविक केले. ज्योत्स्ना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुमन कुवर यांनी आभार मानले. यावेळी बेबी सरोजा पवार, अनुराधा तुळजापुरे, वर्षा शाईवाले, जैतूनबी मेंढके, शिंदे, अपर्णा कुलकर्णी, मनीषा चव्हाण, समितीच्या सदस्या व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.