आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागाची रॅली:एड्स दिनानिमित्त उमरग्यात छत्रपती महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची रॅली

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त गुरुवारी (दि.१) शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव यांनी मार्गदर्शन केले. एड्स हा महाभयंकर रोग आहे व एकदा लागण झाली की व्यक्ति त्या आजारास बळी पडतो.

आज जगात या रोगामुळे खूप माणसे मरण पावत आहेत. तसेच भारतामध्ये तर एड्सची संख्या तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे, असे सांगितले. त्यानंतर रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅली महाविद्यालयापासून उमरगा शहरातील शिवाजी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी उप प्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, डॉ. डी. व्ही. थोरे, कॅप्टन डॉ. डी. एस. चिट्टमपल्ले, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, कॅडेटस उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...