आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवंगडी एकत्र:कुरुलमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ; सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मित्र सहभागी

कुरुल5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दोस्ती मंगल कार्यालयात कुरुल जिल्हा परिषद शाळेतील १९७० सालच्या बॅचचे सवंगडी भेटले. मित्रांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. घेतली. कारण होते शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठीच्या स्नेहमेळाव्याचे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, क्षेत्रात प्रवास करत गेल्या ४० वर्षांत जिल्हा परिषद शाळेने घडवलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र यावेत, यासाठी स्नेहमेळाव्याचे केले होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. दत्तात्रय कदम, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी, गणपत कत्ते, विलास शिवशरण, बाबूराव पाटकर, बाजीराव साळुंखे, भगवान जाधव, कुबेर खटके, ब्रह्मदेव निकम, जगदीश कुलकर्णी, विष्णू जाधव, अंबादास गुरव आदी या वेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...