आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगपंचमी साजरी:तुळजाभवानी मंदिरात‎ कोरड्या रंगाने रंगपंचमी‎

तुळजापूर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिरात रविवारी‎ (दि.१२) कोरडा रंग खेळून रंगांचा‎ उत्सव साजरा करण्यात आला.‎ यावेळी तुळजाभवानी मातेला‎ महंतांसह पुजाऱ्यांनी रंग लावून‎ पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी‎ केली. दरम्यान, रविवारच्या‎ सुटीमुळे मातेच्या दर्शनासाठी‎ भाविकांनी दिवसभर गर्दी केली.‎ सकाळच्या अभिषेक पूजेनंतर‎ धूपारती करण्यात आली. त्यानंतर‎ तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवर‎ रंगाची उधळण करण्यात आली.‎

महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी‎ बुवा, मंदिर संस्थानचे धार्मिक‎ व्यवस्थापक नागेश शितोळे‎ यांच्यासह पूजारी, सेवेकरी, मंदिर‎ संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मंदिर परिसरात महंत-पुजाऱ्यांनी‎ एकमेकांना रंग लावून रंगपंचमी‎ साजरी केली. सकाळच्या अभिषेक‎ पूजेनंतर रंगपंचमीनिमित्त‎ तुळजाभवानी मातेला पांढराशुभ्र‎ शालू नेसवण्यात आला. पांढऱ्या‎ शालूवर सप्तरंगांची उधळण‎ करण्यात आली.‎

सण-उत्सव साजरे‎ करण्याची प्रथा
तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा,‎ रंगपंचमी, रथसप्तमी,‎ दसरा-दीपावली, गणेशोत्सव, बैल‎ पोळा आदी सणांसह स्वातंत्र्य दिन,‎ प्रजासत्ताक दिन, शिवजयंती हे‎ राष्ट्रीय सण साजरे करण्याची प्रथा‎ आहे. या दिवशी देवीला उच्च प्रतीचे‎ अलंकार घातले जातात.‎

बातम्या आणखी आहेत...