आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:खुल्या प्रवर्गातून 41 वा क्रमांक; अभियांत्रिकी सेवा परीक्षेत यशाबद्दल विष्णू कांबळेंचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

उमरगा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा सन-२०२० मध्ये विष्णू कांबळे यांनी खुल्या प्रवर्गातून ४१ वा क्रमांक पटकावला. अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम येऊन सहायक कार्यकारी अभियंतापदी त्यांची निवड झाली. याबद्दल जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी त्याचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

विष्णू कांबळे यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करत २४ व्या वर्षी नेत्रदीपक यश संपादन केले. त्यांचे मुळ गाव निलंगा तालुक्यातील मदनसुरी आहे. २००२ मध्ये घरगुती हिंसाचारात ते चार वर्षांचे असताना आईचे निधन झाले होते. वडील खुनाच्या शिक्षेत कारागृहात होते. तेव्हापासून त्यांचा सांभाळ मामा व आजीने केला. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण चिंचोली भुयार येथे आजोळी जिल्हा परिषद शाळेत झाले. विष्णू परीक्षा देऊन सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग-२ अधिकारी झाले होते. एमपीएसीतून पूर्व, मुख्य व मुलाखत हे तीन टप्पे पार करत त्यांची आता सहायक कार्यकारी अभियंतापदी निवड झाली आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ‘मराठा पतपातशाही’ पुस्तक देऊन सत्कार केला. याप्रसंगी अशोक पवार, महेश पवार, गोविंद सुरवसे, राहुल सुरवसे, सुभाष कांबळे, आकाश सुरवसे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...