आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजासाठी काम करण्याची प्रवृत्ती राष्ट्रीय सेवा योजना मुळे निर्माण होते असे मत गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेशकुमार माने यांनी रुई येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व रा.गे.शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता व जलसंवर्धनासाठी युवा या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समारोप समारंभप्रसंगी येथील सरपंच कुसुम जगताप, उपसरपंच पाटील तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश सरवदे, प्रा. अमर गोरे पाटील, प्रा.डॉ. संभाजी गाते, प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड, प्रा.डॉ.अरुण खर्डे, प्रा.डॉ.विशाल जाधव, प्रा.डॉ.अतुल हुंबे, मुख्याध्यापक राऊत तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उपस्थित होते.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व ३१ दात्यांचे रक्तदान
शिबिरात जलसंवर्धन, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान शिबीर, ग्रामस्वच्छता, व्यक्तिमत्त्व विकास, महिला सबलीकरण व व्यसनमुक्ती आधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. डॉ. आनंद मोरे, डॉ. विद्याधर नलवडे, डॉ. प्रकाश सरवदे आदीनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. भगवंत ब्लड बँक बार्शी येथील कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहकार्य केले. रक्त शिबिरात एकूण ३१ दात्यांनी रक्तदान केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.