आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवकीनंदन गोपाला:राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना जिल्हयात स्मृतीदिनी ठिकठिकाणी अभिवादन

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयात थोर समाज सुधारक व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन मंगळवारी (दि२०) अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ विजय सरपे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी बोलताना प्राचार्य डॉ सरपे म्हणाले की, समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा-परंपरा, जाती-भेद नष्ट होण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून रात्री मेंदू साफ करणारे अन् दिवसा हातात खराटा घेवून गावाची स्वच्छता करणारे खरे राष्ट्रसंत गाडगे महाराज हेच खरे समाज परिवर्तनाचे जनक आहेत.

प्रतिकूल काळात शिक्षण, स्वच्छता आणि समाजप्रबोधन करुन माणूस म्हणून जगण्याचा धडा देणारे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे गाडगे महाराज होय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणत जनजागृती करणारे खरे राष्ट्र संत होय. यावेळी प्रा. डॉ. प्रवीणकुमार कदम, प्रा. भाऊ पवार प्रा. अंकुश कदम, प्रा. देविदास चव्हाण, प्रा. तेजस्विनी करंडे, प्रा. सविता गिड्डे, माधव दुर्गे, विजयकुमार मोरे, दगडू सुरवसे आदी उपस्थित होते. डॉ प्रविण कदम यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...