आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतर:लोकमंगल माऊली कारखान्यात ऊसतोड कामगारांना रेशन वितरण

लोहारा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लोकमंगल माऊली साखर कारखान्यात शनिवारी (दि.१९) ऊसतोड कामगारांना रेशन धान्य वितरणास सुरुवात करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यात कामाला आलेल्या ऊसतोड कामगारांना कारखान्याच्या ठिकाणी रेशन वितरणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सुरू केला आहे.

त्यानुसार शनिवारी लोकमंगल माऊली साखर कारखान्याच्या ठिकाणी विविध जिल्हयातून, परराज्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांना स्वस्त धान्य वितरणास सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पोर्टबिलिटीद्वारे धान्य वाटप केले जात आहे. सदर वाटप कारखान्याच्या ठिकाणी हंगाम संपेपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे कामगारांना दिलासा मिळेल.

परजिल्हा, परराज्यातील ऊसतोड मजुरांची कामासाठी स्थलांतरामुळे रेशन अभावी होणारी अडचण दूर होणार आहे. शनिवारी धान्य वितरणास सुरुवात करतेवेळी लोहाऱ्याचे तहसीलदार संतोष रुईकर, लोकमंगल माऊली साखर कारखान्याचे प्रशांत पाटील, व्यंकटेश वाघोलीकर, शेतकी अधिकारी कुलकर्णी, नायब तहसीलदार महादेव जाधव, शासकीय स्वस्त धान्य दुकानदार दिलीप जाधव, इनुस पटेल, गुरुनाथ पाटील, कारखान्यातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, मुकादम, ऊसतोड कामगार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...