आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:रत्नापूर उपसरपंचपदी सिध्देश्वर टेकाळे‎

येरमाळा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील रत्नापुर ‎ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जनमत विकास पॅनलचे सुनिल वाघमारे तर ‎उपसरपंचपदी येडेश्वरी विकास ‎ ‎ आघाडीचे (महाविकास‎ आघाडीचे) सिध्देश्वर टेकाळे‎ यांची बिनविरोध निवड करण्यात‎ आली आहे. ग्रामपंचायत २०२२-२३‎ ची निवडणुक नऊ जागेसाठी झाली‎ होती.सरपंच पदासाठी दोन गटामध्ये‎ चांगलीच रंगली होती.‎

निवडणुकीच्या निकालामध्ये‎ जनमत विकास आघाडीच्या‎ सरपंचपदाचा उमेदवार सुनिल‎ वाघमारेसह चार तर महाविकास‎ आघाडीचे अविनाश जाधवर यांच्या‎ नेतृत्वाखाली विशाल‎ जाधवर,सौ.शुभांगी निकम,सौ.पुनम‎ शिंदे,दिंगाबर वाघमारे,सौ.पुष्पा‎ जाधवर हे पाच उमेदवार निवडून‎ आले होते. पंरतु उपसरपंच पदासाठी‎ जोरदार रस्सीखेच होऊ लागल्यानै‎ जनमत विकास पॅनलमध्ये दोन गट‎ पडले.

निवड प्रक्रीया सुरु‎ झाल्यानंतर निवडून आलेल्या‎ राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाच आणि‎ शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा एक‎ सदस्य मिळवुन उपसरपंचपदासाठी‎ मविआ कडून सिध्देश्वर टेकाळे‎ यांचा एकच अर्ज अाल्याने‎ निवडणूक अधिकाऱ्यांनी टेकाळे‎ यांची बिनविरोध निवड झाल्याचे‎ जाहीर केले. या निवडीनंतर हार‎ घालून सत्कार करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...