आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाचनानं माणसाला जगातलं सारं कळतं
भल-बूरं, खरं खोटं आपोआप वळतं...
समाधान शिकतोड यांच्या या कवितेने २१ व्या शतकातही पुन्हा ग्रंथ आणि वाचनाचे महत्त्व अधोरेखीत झाले. प्रयोजन होते, जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सवातील पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या कविसंमेलन या पुष्पाचे.
शनिवारी दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवी डी. के. शेख यांच्या अध्यक्षतेखाली उदयोन्मुख कवींच्या काव्य सुमनांनी हे पुष्प गुंफले गेले. यात जिल्ह्यातील हरहुन्नरी कवींनी आपल्या गझल आणि काव्याच्या माध्यमातून आजची स्त्री...वाचनाची आवड, सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्वच क्षेत्राला झटकून टाकत वास्तवतेचे दर्शन घडवले.
कुणी कुपोषित, अन्नासाठी दाहिदिशांना फिरतो अंधभक्त तो दूध शिळेवर रोज ओततो ’येथे एकीकडे दाेन घास खाण्यासाठी वणवण फिरणारा व दुसरीकडे त्या विरुद्धची स्थिती किरण देशमाने यांनी गझलेतून माडली. तसेच त्यांच्या बाई या गझल मधील शेर मुळे सभागृह स्तब्ध झालेे. हरवते पसारा जमवण्यात ...बाई जखडते पुन्हा त्या पसाऱ्यात बाई.... सदा कष्ट-ते ऊब देण्या घराला स्वत: मात्र राही निखाऱ्यात ...बाई... स्नेहलता झरकर यांच्या म्हणते या गझलेने हरलेल्या, थांबलेल्या, हताश झालेल्यांना पुन्हा नव्याने बळ देण्याचे काम करणारी गझल सादर करुन उमेद निर्माण केली. अथांगतेला अवकाशाच्या भिडून घ्यावे म्हणते, मरण्याआधी जमेल तितके जगून घ्यावे म्हणते..... आशेलाही पंख मिळाले विशाल अंबर दिसता, चाकोरीलाही सोडून थोडे उडून घ्यावे म्हणते... यातून समाजाची चाकोरी सोडून मनसोक्त बागडणे, पुढे जाण्याचे आवाहन केले. प्रा. विद्या देशमुख यांच्या बाई या कवितेने स्त्री जीवनातील वास्तव मांडले. कणखर बाई तुझ्या कण्याच्या पुढे झुकावे म्हणते, आणि हळव्या बाईपणाला आज नमावे म्हणते.... त्याचबरोबर कधी कणखर तर कधी मऊ असते माय, जगायचे कसे याची जाणीव अलका टोणगे यांनी माय कवितेतून दिली. चुलीच्या जाळानं जगणं शिकवायची माय,
कधीच कोणाला रागवत नसायची माय....तसेच शाम नवले, अरविंद हंगरगेकर, अविनाश मुंडे, शंकर कसबे, शिवराज मेनकुदळे, बप्पासो नाईकनवरे, युवराज चव्हाण, सोनाली आरडले, सविता बिडवे, संगीता भांडवले, डॉ. रेखा ढगे, अपर्णा चौधरी, संगीता पोतदार यांनीही कवीता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज नळे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.