आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी नगर व धाराशिव नावाला विरोध करणाऱ्या व आंदोलनात औरंगजेबाचे फोटो लावून उदात्तीकरण करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तुळजापुरात मंगळवारी (दि.१४) विद्रोह मोर्चा काढण्यात आला. यावेळी इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला तहसील कार्यालयासमोर जोडे मारण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सरकारने नामांतर करून त्यावर शिक्कामोर्तब केले असताना विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, विद्रोह मोर्चाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेला रथ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्रोह मोर्चाला प्रारंभ झाला. भवानी रोड मार्गे तुळजाभवानी मंदिर मार्गे छत्रपती संभाजी महाराज उद्यानात मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. मोर्चात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, प्रदेश संघटक अतुल गायकवाड, दिनेश जगदाळे, पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, मराठा मूक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, स्वराज्य संघटनेचे महेश गवळी, जीवनराजे इंगळे, कुमार टोले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, अर्जुन साळुंके आदींनी सहभाग नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.