आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:राज्यपालांना परत बोलवा, राष्ट्रवादीचे राष्ट्रपतींना निवेदन

उमरगा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करत परत बोलवा, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्यामार्फत सोमवारी (दि ०१) देण्यात आले. राष्ट्रवादी युवकच्या वतीने महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हा ! अशी शेकडो पत्रं कार्यकर्त्यांच्या वतीने पाठवली.

राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सातत्याने महापुरुषांचे आणि महाराष्ट्र राज्याचा अवमान होईल असे वक्तव्य करत आहेत. त्यांच्या या वक्तव्या वरुण त्यांची भुमीका राज्यपाल पदाचा सन्मान व मर्यादा न ठेवता ते राजकारणात सक्रिय भुमीका घेत आहेत हे निषेधार्यच आहे. या महाराष्ट्र द्वेष्ट्या व्यक्तीची राज्यपाल म्हणुन कामकाज पहाणे महाराष्ट्रासाठी घातक आहे. तरी अश्या व्यक्तीची हकालपट्टी करुन त्यांना परत बोलवुन महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या राज्यपालाची नियुक्ती करावी असे निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पोस्ट कार्यालयातून राज्यपालांना शेकडो पत्र पाठवून त्यात आपण महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यपाल आहात की महाराष्ट्र द्वेष करण्यासाठी असा प्रश्न विचारत राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेतली तिचे प्रामाणिकपणे पालन कराल आणि महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हीच माफक अपेक्षा, लवकर बरे व्हा असा पत्रात मजकूर लिहिण्यात आला आहे.

या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, तालुका सरचिटणीस धिरज बेळंबकर, युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, कार्याध्यक्ष फैय्याज पठाण, मीडिया जिल्हा उपाध्यक्ष अफसर मुल्ला, जेष्ठ नेते नेताजी कवठे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...