आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात बलसूर येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात सोमवारी (२०) दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सचिव प्रा.सुरेश बिराजदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष गोविंदराव सांळुके, संचालक दत्तात्रय बिराजदार, डॉ यतीराज बिराजदार,माजी प्राचार्य शिवाजीराव मारेकर, जी एस देवणे, प्राचार्य श्रीपाद कुलकर्णी, मुख्याध्यापक एन टी कुसुमडे, पर्यवेक्षक सुभाष औरादे, अशोकराव कुंभार, अमोल पाटील, बाळासाहेब बिराजदार, सचिन बिराजदार आदी उपस्थित होते. यावेळी दहावीतील अनिकेत बिराजदार, मुन्नजा शेख,समर्थ वाकडे, बारावी कला शाखेतील आशिष भुजबळ, अंजली पांचाळ, प्रतिक्षा कंटे,बारावी विज्ञान शाखेतील गायत्री स्वामी, धनश्री राजे, कोमल चव्हाण यांच्यासह सैनिकी विद्यालयात प्रवेश पात्र पृथ्वीराज बिराजदार, सालेगाव शाखेत बदली झाल्याने विकास गोरे यांचाहि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बारावी परीक्षेत मराठी विषयात ९७ गुण विद्यार्थ्यांना मिळाल्याने मार्गदर्शक प्रा परमेश्वर सूर्यवंशी यांचाहि सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात प्रा सुरेश बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपल्या आवडीनुसार पुढील शिक्षणाची निवड करत सूक्ष्म पध्दतीने व जिद्दीने अभ्यास करून उच्चित ध्येय साध्य करावे. सद्या स्पर्धेच्या काळात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे. संस्था कायमस्वरुपी विद्यार्थ्यांचे हित जोपासून शैक्षणिक व आवश्यक सुविधा देण्याची प्रा बिराजदार यांनी ग्वाही दिली. यावेळी प्राचार्य कुलकर्णी, डॉ. बिराजदार, श्री सांळुके यांचेही भाषणे झाली. प्रा सूर्यवंशी यांनी सूत्रसंचलन केले. बळीराम नांगरे यांनी आभार मानले. या सत्कार सोहळ्याला प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.