आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शहरात जागृती फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन

उस्मानाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागृती फाउंडेशन व स्मृती बुद्धविहाराच्या वतीने १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

गुणवंत सत्कार व मार्गदर्शन या कार्यक्रमात सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी गडपाटीच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सूरज ननवरे, तडवळ्याचे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आर. डी. अंगरखे, जागृतीचे अध्यक्ष विजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक अतिष कांबळे, प्रेरणा रत्नकांत माळाळे, सपना सुरेश बनसोडे, मानसी विद्यानंद वाघमारे, संघमित्र अविनाश डांगे, संबोधी अविनाश डांगे, महेश सुरेश धकाते, प्रेरणा विजय ताकतोडे नवमत आसेफ पठाण, प्रज्ञा मुकेश मोठे, पल्लवी पवण गायकवाड, ऋषिकेश मधुकर पांडागळे, निकिता महादेव माने, सुमित संतोष वाघमारे, आदित्य दशरथ झेंडे, रेवती सुदर्शन बनसोडे, सुहानी बाबासाहेब कांबळे, आकांक्षा रजनीकांत चव्हाण, वैभव दत्ता लोखंडे, संजना विद्यानंद बनसोडे, प्रफुल्ल सुभाष बनसोडे, सलोनी रंजीत सिद्धगणेश, कुणाल सुभाष बनसोडे, स्वप्नील औदुंबर पालके यांचा संक्षिप्त संविधान पुस्तिका भेट देऊन गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन आदिनाथ सरवदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रणजीत कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकेश मोठे, सोमनाथ गायकवाड, बाबासाहेब कांबळे, सुनील माळाळे, संघा बनसोडे, रावसाहेब मस्के, नानासाहेब भेंडे यांनी अथक परिश्रम घेतले. गुणवंताचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमास गुणवंत, पालकांनीही उपस्थिती लावली.

बातम्या आणखी आहेत...