आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यामध्ये एकूण ५८ प्रकल्पांची नोंद झाली. यापैकी ४ प्रकल्पांची विभागीय स्तरासाठी निवड करण्यात आली आहे.हंगरगा तुळ येथील लोटस पब्लिक स्कूलमध्ये ३० वी जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद पार पडली. प्रारंभी विस्तार अधिकारी दैवशाला शिंदे यांच्या हस्ते परिषदेचा शुभारंभ दिप प्रज्वलनाने करण्यात आला.
यावेळी केंद्र प्रमुख तानाजी महाजन, विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र स्वामी, जिल्हा संघटक प्रकाश मगर, संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव, मुख्याध्यापक धनंजय शहापूरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेचा यशस्वितेसाठी तालुका समन्वयक संगीता पटाडे यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी तर शिवाजी राठोड यांनी आभार मानले. या परिषदेत तालुक्यातील एकूण ५८ प्रकल्पांची नोंद झाली. डॉ. शिवाजी जेटीथोर व डॉ. मंदार गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या प्रकल्पांची विभागीय स्तरावर निवड
१. शिवदर्शन सेकंडरी स्कूल नांदुरीचा श्रेया गिड्डे व श्रेया सूर्यवंशी यांच्या इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्सिजन. २. सरस्वती माध्यमिक विद्यालय तामलवाडीचा सचिन घोडके व सार्थ शिंदे यांच्या तामलवाडी गावातील पिण्याच्या पाण्याच्या वापरामुळे मूत्रपिंडांवर होणारा परिणाम अभ्यासणे. ३. भैरवनाथ माध्यमिक विद्यालय तीर्थ खुर्दचा प्रगती जाधव व रोहिणी शिंदे यांच्या पाळीव प्राण्यांना त्रास होणाऱ्या कीटकापासून संरक्षण करणारी धूपबत्ती. ४. छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय मसला तुलसी नरवडे व आदिती बागल यांच्या आत्मनिर्भरतेसाठी परिसंस्थेवर आधारित दृष्टिकोन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.