आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीए(चार्टर्ड अकाऊंटंट) महेश मिनियार यांनी सायकलींगमध्ये नवा विक्रम केला आहे. त्यांनी तीन दिवसात ५०० किलोमिटर सायकलींग करत उस्मानाबाद ते कोकणातील गणपतीपुळे हे अंतर पूर्ण केले. गेल्या ५ वर्षांपासून ते सातत्याने सायकलींग करत असून, पुढच्या काळात १ हजार किलोमीटरचे टार्गेट असल्याचे त्यांनी सांगितले. आजवर उस्मानाबादमध्ये सर्वाधिक सायकलींग करणारे मिनियार हे पहिले व्यक्ती मानले जातात.
उस्मानाबादेत अलीकडे सायकलचा वापर वाढू लागला आहे. सायकलींगचे आरोग्यासाठी फायदे आहेत. उस्मानाबादेत सायकलींगचे नवे ग्रुप तयार होत आहेत. तीन वर्षांपूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मंुडे यांच्या पुढाकारातून सरकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारीही सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर करत होते.त्यानंतर दिव्य मराठीच्या पुढाकारातून सायकल रॅलीही काढण्यात आली. दररोज किमान अर्धा ते एक तास सायकलींचा वापर करणारे अनेकजण आहेत. त्यात सीए महेश मिनियार यांचाही समावेश आहे. मिनियार यांनी ५ वर्षांपासून सायकलींचा नियमित सराव सुरू केला.
ते उस्मानाबाद ते तुळजापूर तर कधी तेथून औसा, किंवा सोलापूर, असा प्रवास केला.मात्र, एकाचवेळी ५०० किलोमिटर सायकलींग करावी, अशी त्यांची दृढ इच्छा होती. त्यामुळे ते २९ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता गणपतीपुळेसाठी सायकलवरून मार्गस्थ झाले. ३१ जानेवारीला ते गणपतीपुळे येथे पोहोचले. हे अंतर ४६० किलोमिटर असले तरी त्यांनी जवळच्या जयगडपर्यंत जाऊन ५०० किलोमिटरचा टप्पा पूर्ण केला. प्रचंड घाट, वळण आणि डोंगररांगामधून असलेला हा मार्ग त्यांनी दररोज साधारण १६० किलोमिटर अंतर कापत पूर्ण केला आहे.
सातत्यपूर्ण सराव, दृढ इच्छेने शक्य झाले
सायकलींचा सातत्यपूर्ण सराव असल्यामुळे व मनात दृढ इच्छा असल्यामुळे मी ५०० किलोमिटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्याही गोष्टीत सातत्य हवे. रोजच्या धावपळीत व्यायाम हवाच. स्वत:साठी वेळ दिल्याशिवाय हे शक्य नाही. व्यायामासाठी जितेंद्र खंडेरिया यांच्याकडून प्रेरणा मिळाली.आता पुढचा टप्पा १ हजार किलोमिटरचा असेल. - महेश मिनियार, सीए,उस्मानाबाद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.