आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाठपुरावा केल्यानंतर 7-12 वर नोंद, पण ताबा नाही; जमिनीच्या ताब्यासाठी लाभार्थींचे बेमुदत उपोषण

कळंब4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मोहा येथील पारधी समाजातील तीन जणांना स्वाभिमान व सबळीकरण योजना अंतर्गत देण्यात आलेल्या जमिनीचा ताबा अनेक वर्षांपासून देण्यात आलेला नसल्यामुळे या मागणीसाठी लाल पँथर संघटना व पारधी समाजाच्या तीन लाभार्थींनी कुटुंबांसमवेत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह अंदोलन सुरू केले आहे.

दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजुर कुटुंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांचे राहणीमानात सुधारणा व्हावी, त्याचे शेतमजुरीवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे, हा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील मोहा येथील पारधी समाजातील नानीबाई शिवाजी काळे यांना गटनंबर ७१७ मधील ८० आर , शालनबाई यांना गटनंबर ७२५ मधील १ हेक्टर २० आर, लता शिवाजी काळे यांना गटनंबर ७२५ मधील १ हेक्टर २० आर जमीन देण्यात आली होती. हे कुटुंब अशिक्षित असल्यामुळे यांचा सात बारा वरसुध्दा नोंद झाली नव्हती, वारंवार या लोकांनी पाठपुरावा केला होता. अखेर दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी सातबारावर नोंद झाली आहे. मात्र ताबा देण्यात आलेला नाही.

निवेदनाला केराची टोपली
मोहा येथील पारधी समाजातील तीन जणांना स्वाभिमान व सबलीकरण योजनेतून मिळालेल्या जमीनीवर अनेक वर्षांपासून ताबा देण्यात आलेला नाही, तो ताबा देण्यात यावा या मागणीसाठी लाल पँथर संघटने चे बजरंग ताटे व संबंधित लाभार्थींनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या लाभार्थींनी दिनांक ४ एप्रिल पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...