आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड प्रकिया:145 पदांसाठी होणार रोजगार मेळाव्यातून भरती

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत खासगी क्षेत्रातील उद्योजक, कंपनीकडे १४५ पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या ऑफलाइन किंवा ऑनलाइन मुलाखती घेऊन निवड प्रकिया करण्यात येणार आहे. यासाठी २२ ते २७ सप्टेंबर २०२२ दरम्यान ऑनलाइन अर्ज करावा.

ऑनलाइन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉब सिकर रजिस्ट्रेशन करून आपल्या प्रोफाइलमध्ये शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रतेचा तपशील, आधार क्रमांक, मोबाईल, ई-मेल, पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर मेळाव्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स कराव्यात. अर्ज करण्यास काही अडचण आल्यास (०२४७२) २९९४३४ / ९०२८२३८४६५) या क्रमांकावर संपर्क साधवा.

बातम्या आणखी आहेत...