आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पीकविमा, हमीभावासाठी ई-पीक पाहणीची नोंद करा ; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची ई-पीक पाहणी कार्यक्रम सुरू झाला आहे. पिकांच्या नुकसानीपोटी पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पाहणीमध्ये नोंद बंधनकारक आहे. चालू खरीप हंगामातील पिकांची नोंद शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी. यासाठी जुने ॲप डिलीट करून नवीन ॲप डाऊनलोड करत त्यात माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदीसाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ नव्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपमध्ये नोंदवलेल्या पीक पाहणीमध्ये ४८ तासांच्या आत दुरुस्ती करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय हमीभावाने नाफेडमध्ये पिकाच्या विक्रीसाठी नोंदवल्याची सुविधा देखील यंदा या अॅपमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीसाठी ताटकळण्याची गरज राहणार नाही. खातेदारांना त्यांच्या गावातील संपूर्ण पीक पाहणी नोंद पाहण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुख्य पीक व दोन दुय्यम पिकाची नोंद करता येत होती.

या हंगामापासून एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांच्या नोंदीची सुविधा आहे. याशिवाय खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करायची झाल्यास तलाठ्याकडे अर्ज करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी https:/play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ हे नवीन ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून आपल्या शेतातील पिकाची नोंद शेतकऱ्यांना स्वत: शेतामध्ये जाऊन करायची आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाइल नाही किंवा वापरता येत नाहीत, अशा शेतकऱ्यांनी कोणाच्याही मोबाइलद्वारे ई-पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...