आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने जिल्ह्यातील ९ हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची नोंदणी सुरू केली आहे. शासन आदेशानंतर खरेदी करण्यात येणार आहेत. हमीभावाने (५३३५ रुपये क्विंटल) हरभऱ्याची विक्री करण्यासाठी जवळच्या हमीभाव केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपे यांनी केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनचे नऊ खरेदी केंद्र सुरू झाले. आडत बाजारात हरभऱ्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती.
हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बेभावाने हरभऱ्याची विक्री केली, उर्वरित शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या हमीभाव केंद्रावर रितसर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा हरभरा शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर ५३३५ रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्यात येणार असून नोंदणी करण्यासाठी ई -पीक पाहणी केलेला ७/१२, आठ-अ, बँक पासबुक व आधार कार्डसह शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर भेट देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करायची आहे, त्यांनी ऑनलाइन नोंद करावी. ज्या शेतकऱ्यांची नोंद होणार नाही, त्यांचा हरभरा खरेदी केला जाणार नाही, असे सांगण्यात आले.
या केंद्रांवर नोंदणी सुरू
धाराशिव तालुक्यात धाराशिव खरेदी विक्री संघ, कळंब येथे एकता सहकारी संस्था, वाशी खरेदी विक्री संघ, भूम खरेदी विक्री संघ, ईट येथे तनुजा महिला सहकारी संस्था, तुळजापूर खरेदी विक्री संघ, लोहाऱ्यात वसुंधरा अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी, उमरगा येथे स्वामी समर्थ सहकारी संस्था, गुंजोटी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने हमीभावाने हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.