आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद:वीजग्राहकांसाठी १० रोजी सोडत

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट महिन्यात मुदतीत वीजबिल भरणाऱ्या मराठवाड्यातील घरगुती ग्राहकांना महावितरणच्या योजनेत भरघोस बक्षिसे जिंकण्याची आणखी एक सुवर्णसंधी मिळाली आहे. जुलैची सोडत १० ऑगस्ट रोजी आहे. जून महिन्याच्या पहिल्या सोडतीत २३८ भाग्यवान ग्राहकांनी बक्षिसे जिंकली आहेत. महावितरणच्या या आगळ्यावेगळ्या योजनेमुळे ग्राहकांचा वीजबिल भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

घरगुती ग्राहकांना दर महिन्याला वेळेवर वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोदावले यांच्या संकल्पनेतून ही अभिनव बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरण त्यांना वारंवार आवाहन करते परंतु सर्वच ग्राहक वेळेवर बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...