आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहमेळावा:स्नेहमेळाव्यात आठवणींना उजाळा; सादरीकरणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा

कळंब3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विद्याभवन हायस्कूल येथील आजी व माजी विद्यार्थ्यांचा संगीतमय स्नेहमेळावा संपन्न झाला.विद्याभवन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी डॉ. अभिजीत जाधवर, प्रा. संजय घुले, डॉ. रुपेश कवडे यांनी जुन्या आठवणीला उजाळा दिला व आपले गीत सादर केले.

अतिशय उत्साही सादरीकरणातून मुलांना प्रेरणा देण्याचे काम या त्रिकूटाने केले. आजी विद्यार्थी चेतना काळे, विधी बलदोटा, श्रावणी हिरे, मोनाली भांगे, जानवी कोठावळे, तेजस्विनी बाराते, श्रेया देशमाने, आकांक्षा पवार, अक्षरा पोदार यांनी सादरीकरण केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभवन हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. जगदेवी कोळी या उपस्थित होत्या. तसेच सुशीलकुमार तीर्थकर, विनोद सागर, सुनील बारकुल, अरविंद शिंदे, अशोक राऊत, एम. एन. बारकुल, आशा लोहार, सुवर्णा गव्हाणे, भाग्यरेखा लोमटे, रेखा तीर्थकरक, रोहिणी मोहेकर, शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...