आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मांडला. शिष्टमंडळ म्हणाले की, व्यापाऱ्यांतून अनेक दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची मागणी होत होती. सचिव दत्ता६य वाघ यांनी यासाठी पुढाकार घेतला असता अतिक्रमणधारकांनी सचिन वाघ यांना धमकी दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आडत बंद ठेवून निषेध नोंदवला होता. मात्र, अद्यापही अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.
त्यांनी व्यापाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांची भेट घेतली. भेटीत अतिक्रमण व सततच्या चोऱ्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच बाजार समितीच्या आवारात गुन्हे प्रवृत्तीच्या काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बाजार समिती आवारातील अतिक्रमण काढले नाही तर कोणताही व्यापारी शेतमाल खरेदी करणार नाही.
बाजार बेमुदत बंड ठेवण्यात येईल. परवानाधारक परवान्याचे नूतनीकरण करणार नाही अथवा नवीन परवाना काढणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत फाटक, भागवत पुरी, किरण जोशी, लक्ष्मण कोल्हे, नंदकिशोर मोरे, विजयचंद रुणवाल, निलेश होनराव, गणेश लाखे, व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.