आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मोतीझरा स्मशानभूमीचे सव्वा कोटीतून नूतनीकरण, हद्दवाढमध्ये नागरिकांना सुविधा; तुळजापुरात विविध योजनेंतर्गत ६ कोटींची कामे सुरू

प्रदीप अमृतराव । तुळजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनेक भागात विविध योजने अंतर्गत जवळपास ६ कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू असूने बहुतेक कामे हद्दवाढ भागात होत असल्याने येथील नागरिकांची गैरसोय थांबणार आहे. मोतीझरा स्मशानभूमीचे सव्वा कोटी खर्चून नूतनीकरण सुरू आहे.

पालिकेच्या वतीने अण्णा भाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजना, दलीत वस्ती, दलीतेत्तर वस्ती सुधार योजना तसेच सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत शहरात ६ कोटींची विकासकामे सुरू आहेत. या काँक्रीट रस्ता, पेव्हर ब्लाॅक व नाली, रस्ता मजबुतीकरणाची कामे करण्यात येत आहे. सर्वाधिक विकास कामे प्रभाग क्र. १ मध्ये सुरू आहेत. तुळजापूर खुर्द येथील नेताजी नगर, भावसार भक्त निवास येथे सिमेंट रस्ता तर शिंदे प्लाॅटिंगमध्ये रस्ता मजबुतीकरण, लातूर रोडवरील समता काॅलनी या भागात करण्यात येत आहेत. या शिवाय प्रभाग क्र. २ हाडको, विश्वास नगर तसेच प्रभाग क्र. ७ संत रोहिदास नगर, प्रभाग क्र. १० नळदुर्ग रोड, एसटी काॅलनी भागात सुरू आहेत. मिळालेल्या निधीत स्मशानभूमीत विकास योजनेंतर्गत आपसिंगा रोड वरील मोतीझरा स्मशानभूमीचे १ कोटी २४ लाख रुपये खर्चून नूतनीकरण सुरू आहे. यात संरक्षक भिंतीसह दोन दहन शेड, नागरिकांसाठी प्रतीक्षा शेड पेव्हर ब्लाॅक, लाॅन व झाडे लावण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेल्या स्मशानभूमीचे रूपडे पालटण्याची आशा व्यक्त होत आहे.

दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेसाठी २ कोटी ३० लाख: दलीतेत्तर वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्र. १ व प्रभाग क्र. २ मध्ये २ कोटी ३० लाख रुपयांची रस्ता मजबुतीकरण व रस्ता काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. शहरातील तुळजाई नगर, नेताजी नगर, विश्वास नगर, समता काॅलनी, शिंदे प्लाॅटींग या भागात कामे सुरू आहेत.

रस्ता मजबूतीकरण व रस्ता काँक्रिटीकरण
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्र. २ हाडको विश्वास नगर तसेच प्रभाग क्र ७ संत रोहिदास नगर, प्रभाग क्र. १० नळदुर्ग रोड वर तुळजाई पंचायत समिती कर्मचारी गृहनिर्माण संस्थेत रस्ता काँक्रिटीकरण व नालीची ३ कोटी २६ लाख रुपयांची कामे सुरू आहेत.

एसटी काॅलनीत पेव्हर ब्लाॅक
सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत शहरातील एसटी काॅलनी येथे ५२ लाख रुपये खर्चून पेव्हर ब्लाॅक व नालीचे काम करण्यात येत आहे. एसटी काॅलनी येथील गणपत हाॅटेल ते सैनिकी विद्यालय गेट पर्यंत काम करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...